Breaking News

दुंदरेच्या उपसरपंचपदी निरा चौधरी बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या निरा शांताराम चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांचे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

दुंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंगळ गणेश उसाटकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भाजपच्या निरा शांताराम चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

या वेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, खैरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच मंगळ्या वारगडा, दुंदरेचे सरपंच अनुराधा वाघमारे, माजी उपसरपंच रमेश पाटील, दर्शना चौधरी, किशोर पाटील, मंगळ उसाटकर, सदस्य बंडू कातकरी, कार्यकर्ता शांताराम चौधरी, विष्णू चौधरी, नारायण चौधरी, गुरुनाथ चौधरी, गुलाब चौधरी, प्रदीप चौधरी, तुकाराम चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, काशिनाथ चौधरी, राजेश भोईर, रुपेश भोईर, गुरुनाथ भोपी, शत्रुघ्न उसाटकर, हरेश माळी, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार राठोड, विष्णू वाघमारे, पोलीस पाटील रवी पाटील, रामदास म्हात्रे, जनार्दन शेळके, गणेश उसाटकर, कैलास केणी, नंदू पावशे, यशवंत पवार आदी उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply