दोन जण किरकोळ जखमी
खोपोली : प्रतिनिधी
ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत.
पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे टँकर एक्सप्रेस वेवरून 50 फूट खाली कोसळला. हा टँकर रिकामा असल्याने जीवित हानी झाली नाही. टँकरमधील चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लिनर यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.