Breaking News

एक्स्प्रेस वेवरून टँकर कोसळला

दोन जण किरकोळ जखमी

खोपोली : प्रतिनिधी

ब्रेक निकामी झाल्यामुळे मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरून जाणारा टँकर शुक्रवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास 50 फूट खाली जुन्या महामार्गावर कोसळला. सुदैवाने यातील चालक आणि क्लिनर बचावले असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत.

पुण्याहून मुबंईकडे चाललेला टँकर बोरघाटातील  दत्तवाडीजवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी  झाले. त्यामुळे टँकर एक्सप्रेस वेवरून 50 फूट खाली कोसळला. हा टँकर रिकामा असल्याने जीवित हानी झाली नाही. टँकरमधील चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टँकरमध्ये  अडकलेल्या चालक आणि क्लिनर यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply