Breaking News

चांग्याचापाडा रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी, बारावीपर्यंत वर्ग करण्याची मागणी

पनवेल : शहापूर तालुक्यातील चांग्याचापाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेवर अकरावी आणि बारावीपर्यंत वर्ग सुरू करावे, या मागणीसंदर्भातील निवेदन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकेनेते रामशेठ ठाकूर यांना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य बबन हरणे यांनी गुरुवारी दिले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, भरतशेठ तेलंगे, विशाल विशे उपस्थित होते.

उलवे नोड : गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल मॅनेजर व जिम ट्रेनर दीपक आणि समीर कोलगे यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.

खालापूर ः भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कलोते येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, चिटणीस यशवंत जोशी, चौक जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील मुकादम, कलोते ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठोंबरे, शिवाजी ठोंबरे, राकेश ठोंबरे, दर्शन पोळेकर, मंगेश ठोंबरे, खालापूर तालुका सोशल मीडिया सहसंयोजक राजेंद्र कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते शशीकाका साखरे, नरेश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे भाजप राज्य परिषद सदस्य विनोद साबळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उरण : नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष व विकी पाटील युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित गुरुवारी रायगड जिल्हा परिषद शाळा बोकडविरा आणि फुंडे या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तरे वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आर. के. दिवाकर, खारघर भाजप महिला सरचिटणीस बिना गोगरी, अनु आर्या, गुरुनाथ म्हात्रे, नितीन म्हात्रे, रूपेश पाटील, राकेश पाटील, संदीप पाटील, क्रांतिवीर म्हात्रे, केतन पाटील, करण पाटील, रूपेश म्हात्रे, विनय पाटील, चेतन ठाकूर, राज पाटील, राजेश पाटील, कुणाल घरत, संतोष पाटील, स्वप्नेश पाटील, अजित घाडगे, स्वप्नील साळुंखे, विश्वजित घरत, राहुल पाटील, सँडी ठाकूर आदी.

कामोठे : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठे येथील जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे सभापती विकास घरत, नगरसेविका संतोषी तुपे, युवा नेते हॅप्पी सिंग, महिला चिटणीस ललिता इनकर, सुंदर वाघमारे, सागर तुपे, संतोष नागमोडे, लता गोडगे, अशोक गोडगे, अमित रोकडे, संदीप तुपे आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply