Breaking News

उरणमध्ये घारीला जीवदान

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील चीर्ले या गावी मुकेश मढवी यांच्या घरावर घार पक्षी बसलेला होता. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पक्षाची धडपड सुरु होती. चीर्ले गावचे पक्षी मित्र आनंद मढवी यांनी त्या घारेला मोठ्या शितीफिने पकडून जीवदान दिले.

पक्षी मित्र आनंद मढवी, पक्षी मित्र पंकज घरत, विनीत मढवी, शुभम मढवी जाऊन त्या पक्ष्यास कोणतीही दुखापत न करता सुरक्षित पकडून वनरक्षक मेजर किरण देवकर, मेजर सूरदास धांडे, वनरक्षक मिलिंद भोईर यांना या घारपक्षाची माहिती  दिली.

भारतात सर्वत्र आठळणारी घार ही एक शिकारी पक्षाची जात आहे. तिचा रंग तपकिरी तिच्या अंगावर भरपूर पिसे असतात. तिचे डोळे अतिशय तिक्ष्ण असतात. ती नेहमी आकाशात उंच उडून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधत असते. बेडूक, सरडे, मटण, मासे, किंवा कोणत्याही पक्ष्यांची पिल्ले आदी खाद्य असते, असे पक्षी मित्र आनंद मढवी यांनी सांगितले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply