नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. स्टार्टअपची संस्कृती देशात सर्वत्र पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संवादात विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्स सहभागी झाले होते. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होता. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी अभिनंदन केले.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …