Breaking News

राज्यस्तरीय एकपात्री, द्विपात्री अभिनय स्पर्धा कलाकारांचा उत्तम प्रतिसाद; मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मायबोली मराठी एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा शनिवारी

(दि. 10) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सुप्रसिद्ध कलाकार भरत सावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कलाप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेलमध्ये पहिल्यांदाच या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातील कलाकारांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध कलाकार भरत सावले यांच्यासह पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, समीर चौगुले, नाट्य परिषद पनवेल शाखाप्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, सदस्य अमोल खेर, स्मिता गांधी, गणेश जगताप यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

विजेत्यांचा गौरव

या राज्यस्तरीय स्पर्धेत मानसी कदम हिने एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला, तर अवंतिका चौगुले आणि सुहास शिंदे यांनी द्विपात्री स्पर्धेत

बाजी मारली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय नाट्य परिषद, पनवेल शाखेचे कार्य कौतुकास्पद असून, या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी कलाकारांसाठी एक व्यासपीठ निर्माण झाले आहे.

-भरत सावले, सुप्रसिद्ध कलाकार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply