Breaking News

वारदोलीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तालुक्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत वारदोली येथील माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 5) भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.

खांदा कॉलनी येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, माजी सरपंच बबन पवार, बेलवली गावचे भाजप अध्यक्ष संतोष पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील, रामदास ढोपरे, अनंता पवार, माजी सदस्य अरुण पवार, बाळाराम पाटील, बाळाराम चोरघे, योगेश पाटील, प्रदीप पाटील, सुनील चोरघे, हेमंत पवार, अनिल पाटील, दत्तात्रेय पाटील, सोपान चोरघे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी प्रणित गायकर, दीपेश म्हात्रे, गौरव गडकरी, आकाश चोरघे, रशिकांत पाटील, निकेश म्हात्रे, तुषार पाटील, राहुल पाटील, सुनील चिखलेकर, अनंता गायकर, अजय पाटील, अविनाश म्हात्रे, महेंद्र चोरघे, अमीर पाटील, आकाश चोरघे, सुरेश पाटील, प्रतीक चोरघे, नारायण म्हात्रे, विकास चोरघे यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply