अलिबाग : प्रतिनिधी
रायगड पोलीस दलात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील सहा पोलीस अधिकारी आणि 54 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचाही समावेश आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अँटीजेन चाचणी केली जात आहे, तसेच विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …