Breaking News

खोपोली हाळवाडीत वृक्ष संवर्धन उपक्रम; डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे खोपोली नगर परिषद हद्दीतील हाळवाडी येथे काही वर्षांपुर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. श्री सदस्यांनी नुकतेच या झाडांच्या परिसरात साफसफाई करून झाडांभोवती कुंपण घातले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या खोपोलीतील शेकडो श्री सदस्यांनी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली  काही वर्षांपुर्वी हाळवाडी येथे पूर्वी लावलेल्या झाडांच्या परिसरात साफसफाई केली, झाडांशेजारी वाढलेले गवत कापून झाडांच्या मुळांना खतपाणी घातले, या झाडांच्या भोवती कुंपण केले.  त्यामुळे परिसर स्वच्छ होऊन वृक्षवाढीचा मार्ग मोकळा झाला. साफसफाई करण्यासाठी लागणारी सर्व अवजारे, साहित्य श्री सदस्यांनी स्वतः आणली होती.  या उपक्रमात श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply