Breaking News

सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.10) समानतेच्या वाटेवर या अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई येथील अ‍ॅड. राजश्री दामले, या प्रमुख वक्त्या होत्या. स्त्री-पुरुष समानता आजच्या काळात किती महत्त्वाची आहे व त्यासाठीच्या उपाययोजना आणि कायदे याविषयी त्यांनीउद्बोधनव्याख्यान दिले. या वेळी महाविद्यालयातील 80 युवकांनी सहभाग घेतला. व्याख्यानाचा उद्देश  विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत जागृती निर्माण करणे असा आहे. या वेळी महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या प्रमुख डॉ. रत्नप्रभा म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महिला विकास कक्षाच्या माजी प्रमुख डॉ. स्मिता भोईर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रश्नोत्तराच्या सत्रात आर्य राठोड (प्रथम वर्ष कला), विकास नाईक (द्वितीय वर्ष वाणिज्य), श्रेयस घरत (तृतीय वर्ष विज्ञान), सुशांत गायकवाड (तृतीय वर्ष कला) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी स्त्रीमुक्ती संघटनेच्या सदस्य अनिता पाटील उपस्थित होत्या तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आय.क्यू. एस. सी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रा. पूजा धांडगे, प्रा. भावेश भोईर व प्रा. आकाश पाटील  यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार प्रा. सोनाली हुद्दार यांनी मानले. व्याख्यानाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी महाविद्यालयातील महिला विकास कक्षाचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply