Breaking News

नागाव ग्रामपंचायतीवर युतीचा झेंडा

सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला असून बुधवारी (दि. 24) सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी शिवसेनेचे चेतन काशिनाथ गायकवाड तर उपसरपंचपदी भाजपचे भूपेंद्र मोतीराम घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नागाव ग्रामपंचायत भाजपचे उपसरपंचपदी निवड झालेल्या भूपेंद्र घरत यांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले. तसेच ग्रामपंचायतमध्ये जावून सर्वांचे अभिनंदन केले.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, सुरज ठवले, नागाव ग्रामपंचायत सदस्या विनया ठाकूर, अमृता घरत, सदस्य अक्षय वाघमारे, मोहन काठे, संदीप ठाकूर, दैवत घरत आदी उपस्थित होते.

नागाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप तीन, शिवसेना तीन, ग्रामविकास आघाडी तीन व गावआघाडी दोन असे एकूण 11 सदस्य आहेत.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply