पणजी : वृत्तसंस्था
गोव्यात आल्यावर मनोहर पर्रिकरांची आठवण येते, माझ्या कारकीर्दीची सुरुवात गोव्यातून झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपने गोव्याचा विकास केला. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. काँग्रेसमुक्त भारत आता प्रत्येक भारतीयाचा संकल्प असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोव्यात पर्यटन वाढले तर देशाचंही पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी भाजपने पायाभूत सुविधांचा विकास केला. या आधीच्या सरकारच्या डोक्यात हा विषय नव्हता. ते दिल्लीत बसायचे आणि फक्त पर्यटनासाठी गोव्यात यायचे.
ते म्हणाले की, गोव्याच्या भूमीतच मी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. आता भारताच्या प्रत्येक नागरिकाने तसा निश्चय केला आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या म्हणजे गोव्याच्या विकासाचा दाखला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या आधीच्या सरकारांनी गोव्याचे महत्त्व कधीही ओळखले नाही. काँग्रेसने गोव्याच्या विकासावर कधीही लक्ष दिले नाही, आता भाजपचे सरकार गोव्याचा विकास करतेय असेही ते म्हणाले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …