कर्जत ़: प्रतिनिधी
कोंकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये नुकताच पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 350 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश ब्राह्मणकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल सादर केला. प्रा. अनुप कुंटे यांनी प्रास्ताविक केले. आपण निवडलेल्या क्षेत्रात एक नंबरला राहण्याचा प्रयत्न करा व मेहनत करून संधीचे सोने करा, असा सल्ला महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. व्ही. भगत यांनी केले. उरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य राजेश लाड, प्रकाश पालकर, दीपक बोराडे, ज्ञानेश्वर जाधव, उपप्राचार्य राजकुमार नारखेडे, प्रा. जी. एस. धानोरकर, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. जी. व्ही. दाखवे संदीप लाड, राहुल देशमुख, अनिल घरत, गजानन लाड, निश्चल शिंदे, किरण पाटील आदी या वेळी उपस्थित होते.