उरण : बातमीदार, वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी (दि. 17) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 140व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील हे होते. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
या वेळी आरती सकट आणि श्रेयस कदम या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयतसेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख यांनी केले. शाळा सल्लागार समितीचे सदस्य मधुकर पाटील, पर्यवेक्षक आर. एस. साळुंखे व सर्व सेवक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विद्यालयाचे उपप्राचार्य पी. पी. मोरे यांनी मानले.