खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन शिक्षण विभागातर्फेगुरुवारी (दि.17) शिवजयंतीनिमित्ताने ’मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी ही स्पर्धा शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमुद केले.
या वेळी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील व्यवस्थापन शिक्षण विभागातील प्रा. रीत थुळे, प्रा. अंकिता जागिड, प्रा. रेवान शिदे, प्रा. प्रवीण सावे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या भाषणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांची महती सादर केली.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनाचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.