पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिरढोण व चिंचवण ग्रामपंचायत हद्दीतील 501 कुटूंबांना विविध वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 18) करण्यात आला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन नव विकास योजनेंतर्गत या वस्तूंचे वाटप उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. वन्यजीव विभाग ठाणे, कर्नाळा पक्षी अभयारण्य अंतर्गत ग्रामपरिस्थितिकीत विकास समिती शिरढोणमार्फत आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने अंतर्गत 144 महिलांना शिलाई मशीन, 78 महिलांना गॅस गिझर, पाच युवक व युवतींना संगणक प्रशिक्षण, पाच युवकांना मोटर ड्रायव्हिंग प्रशिक्षण तसेच 279 महिलांना कुकरचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राठोड, वनपाल मनोज वाघमारे, सचिव भगवान जाधव, ग्रामपरिस्थितिकीत विकास समितीचे अध्यक्ष तथा भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सरपंच साधना कातकरी, उपसरपंच मोनाली घरत, ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, प्रमोद कर्णेकर, गजानन घरत, निकिता चौधरी, रेश्मा वाजेकर सानिका कातकरी, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, तुराडेचे सरपंच चंद्रकांत भोईर, उपसरपंच हरिश पाठारे, माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, सरपंच पद्माकर कातकरी, उपसरपंच वसंत पाटील, सदस्य शरद वांगलीकर, सतीश पारधी, विष्णू ठोकळ, योगेश देशमुख, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, प्रभाकर कार्लेकर, युवा मोर्चा तालुका चिटणीस रमेश मालुसरे, पोसरी ग्रामपंचायतीचे सदस्य बंडू शीद, कमलाकर शीद, गाव अध्यक्ष सुजित पाटील, पोलीस पाटील भगवान पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.