Breaking News

‘त्या’ अपघातातील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पोलादपूर ः प्रतिनिधी

शनिवारी दुपारी पोलादपूरनजीक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या अ‍ॅक्टिवा स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दोघे भाऊ जखमी झाले. त्यापैकी स्कूटरस्वाराचा महाड येथे मृत्यू झाल्याने खडपी गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवीन खरेदी केलेल्या अ‍ॅक्टिवा स्कूटरवरून अमित रघुनाथ शिंदे (वय 30) आणि गणेश रघुनाथ शिंदे (वय 25) हे दोघे भाऊ महाडच्या दिशेने पोलादपूरकडे येताना कंटेनरला धडक लागून हा अपघात घडला होता.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply