उरण : वार्ताहर
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पोलीस ठाण्यात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज प्रियंका पठाडे, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगरसेवक अफशा मुकरी, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, सीमा घरत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
भारतरत्न गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली. महिलांना हळदी कुंकू करून गुलाब पुष्प व भेटवस्तू देण्यांत आल्या. या वेळी गौरी देशपांडे, गौरी मंत्री, दीपा मुकादम, पत्रकार तृपी भोईर, पत्रकार संगिता पवार, कुसम ठाकूर, सामिया बुबेरे, पीएसआय सोनावणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सुहास चव्हाण व महिला कर्मचारी अंजना गायकवाड, रचना ठाकूर, प्रदेवी पाटील, कविता हाते, प्रीती म्हात्रे, अमिता पाटील, सुप्रिया ठाकूर, प्रियंका पाटील, सुरेखा राठोड, भीमराज शिंदे, हरिदास गीते, सचिन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील यांनी केले.