Breaking News

डॉ. अमित दवे यांची शासनाच्या कोविड टास्क फोर्स समितीवर नियुक्ती

पनवेल : प्रतिनिधी – डॉ. अमित भक्तीकुमार दवे यांची राज्य शासनाने कोविडच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतीचा अवलंब करण्याकरिता टास्क फोर्स ऑन आयुष समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी काढले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्या अंतर्गत अलाक्षणिक तसेच अल्पलाक्षणिक उपचारांसाठी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतीचा अवंलब करण्यासाठी कोविड टास्क फोर्स समिती तयार करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये पनवेलच्या डॉ. अमित दवे यांना सदस्यत्व देण्यात आले आहे.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply