Breaking News

नव्या भारतात आडनावाला महत्त्व नाही : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : हा नवा भारत आहे. येथे आडनावाला महत्त्व नाही, तर तुमच्यात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे याला महत्त्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांनी देशवासीयांशी संवाद साधत नवभारताविषयी आपले मत मांडले. ते म्हणाले, अनेक वर्षे एक वेगळीच संस्कृती इथे नांदत होती. तेथे आकांक्षा हा वाईट शब्द होता. तुमचे आडनाव किंवा वशिले पाहून तुमच्यासाठी दारे खुली व्हायची. लायसन्सराजमुळे तरुणांच्या महत्त्वाकांक्षा दडपून जायच्या, पण आता परिस्थिती बदलत आहे. आपण नव्या उमेदीने प्रगती करणारा नवा भारत पाहत आहोत. नव्या भारतात भ्रष्टाचाराला स्थान नाही, मग ती व्यक्ती कोणीही असो!

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply