कामोठे : रामप्रहर वृत्त
असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी भाजप कामोठे मंडळाच्या वतीने दोन दिवसीय मोफत ई-श्रम महानोंदणी अभियान राबण्यात येत आहे. या अभियानास शुक्रवार (दि. 25)पासून भाजपच्या कामोठे येथील कार्यालयात राबवण्यात येत आहे.
या वेळी भाजपचे कमोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर विकास घरत, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, साधना आचार्य, हरिश्री भारद्वाज, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, महादेव पाटील, प्रवीण कोरडे, संदीप तुपे, सुनीता शर्मा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.