Breaking News

पालीतील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा तांत्रिक घोळ

मशीन बंद पडल्याने मतदारांत गोंधळ व संभ्रम

पाली : प्रतिनिधी

विधानसभेच्या पेण मतदारसंघामधील पाली (ता. सुधागड) येथील दोन मतदान केंद्रांवर सोमवारी (दि. 21) तांत्रिक घोळ झाला. येथील ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीन, तर राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन  तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पाऊण ते अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प होती. ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक 3 मधील ईव्हीएम मशीन सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. काय झाले ते कुणालाच कळले नाही. हा बिघाड शोधून नवीन ईव्हीएम मशीन लावण्यास जवळपास पाऊण तास गेला. त्यानंतर दुसरे ईव्हीएम मशीन जोडण्यात आले. ईव्हीएम मशीन बंद पडले तेव्हा त्यात एकूण 125 मतदान झाले होते. त्यानंतर जोडण्यात आलेल्या मशीनमध्ये 125 पासून पुढे मतदान सुरू करण्यात आले. या घटनेनंतर काही वेळाने येथील राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रामधील व्हीव्हीपॅट मशीनदेखील बंद पडले. ही व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आली. तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दोन्ही मतदान केंद्रांवर येऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली व तेथील प्रश्न मार्गी लावला.

तांत्रिक बिघाड होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या, मात्र याची ताबडतोब योग्य उपाययोजना करण्यात आली. यामध्ये काही वेळ गेला असला, तरी या केंद्रावर आलेले कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतली आहे.

-दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply