Breaking News

सीकेटी विद्यालयात परितोषिक वितरण सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021 – 22 चा परितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 25) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या संचालिका आणि सदस्य शाळा समिती अर्चना परेश ठाकूर, माजी विद्यार्थीनी प्रियंका पुरोहित (सी.ए), संतोष देशमुख (जाँईट सेक्रेटरी पालक शिक्षक समिती) तसेच चांगू काना ठाकूर  विद्यालयातील विविध शाखा प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर स्वर म्हात्रे या विद्यार्थ्याने सुमधुर गणेश स्तवन सादर केले. विद्यालयाच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेणार्‍या वार्षिक अहवालाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी या वेळी वार्षिक प्रगतीचा आढावा घेत प्रास्ताविक केले. यानंतर संपूर्ण वर्षभरात कोरोना काळातही यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन स्पर्धांचा परितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला.

शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी भाषण स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विजेती अक्षया वर्तक हिने न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील आपले अभ्यासपूर्ण विचार व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर यांनी कोरोना काळातही विद्यालयाने उत्कृष्टपणे कामकाज केल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष चव्हाण, सुपरवायजर नीरजा मॅडम आणि सर्व शिक्षक यांची प्रंशसा करून अभिनंदन केले. माजी विद्यार्थीनी  प्रियंका पुरोहित हीने नुकतीचे सीएची परिक्षा उत्तीर्ण केली. तिने आपल्या मनोगतामध्ये गोष्टीस्वरूपात विद्यार्थ्यांना येईल त्या परिस्थितीला समोरे जा असा संदेश दिला. सगळ्यांना मान द्या तरच स्वत:ला सन्मान मिळेल असेही सांगितले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष  अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply