Breaking News

अमेरिकेत खेळण्यासाठी भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती; मनन शर्माचा भारतीय क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. चांगल्या संधींसाठी तो कॅलिफोर्नियाला जाणार आहे. माजी भारतीय खेळाडू अजय शर्मा यांचा मुलगा मनन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. 2017मध्ये दिल्लीत पदार्पण केल्यापासून मननने 35 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 27.45च्या सरासरीने 1208 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका अर्धशतकासह त्याच्या नावावर 560 धावा आहेत. त्याने 113 प्रथम श्रेणी विकेट्सदेखील घेतल्या आहेत आणि 26 टी-20 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या आहेत. 30 वर्षीय मननला आयपीएलमध्ये 2016मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 10 लाखांच्या मूळ किमतीसह खरेदी केले होते. 2010च्या अंडर 19 विश्वचषकादरम्यान तो भारतीय संघाचा भाग होता. भारत सोडून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेणारा तो तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी उन्मुक्त चंद आणि समित पटेल यांनीही अमेरिकेत जाऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …

Leave a Reply