Breaking News

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पुण्यातील घटना

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत दोन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पोक्सो, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली गेली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबरला पीडित मुलीचा आईसोबत वाद झाला आणि त्यामुळे रागाच्या भरात ती घर सोडून बाहेर पडली होती. तिला ओळखत असलेल्या एका तरुणाने तुला गावी सोडतो असे म्हणून रिक्षातून आपल्याबरोबर नेले आणि एका इमारतीच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी तिथून आपली सुटका करीत गाडीतळ या ठिकाणी आली. तेथे आलेल्या आणखी एका व्यक्तीने तिला स्वतःच्या दुचाकीवर बसवून भेकराईनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला. या व्यक्तीने दुसर्‍या दिवशी तिला बोपदेव या गावात नेले आणि तिच्यावर आणखी एकदा अत्याचार केला. हा आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या आणखी दोन नातेवाइकांना बोलावून घेतले आणि त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. अशा प्रकारे दोन दिवसांत या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी वेळोवेळी बलात्कार केला.

डॉक्टरचा तरुणीवर अत्याचार

मुंबई : एकीकडे डॉक्टर मंडळी कोरोनाच्या महामारीत कोविड योद्धा म्हणून काम करीत असताना मुंबईतील एका डॉक्टरने आपल्या सहकारी तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर आपल्याला इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यासही सांगत असल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. एका अधिकार्‍याने याबाबत माहिती देताना सांगितले की, 30 वर्षीय तरुणीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात पीडित तरुणीने तक्रारीत लग्नाचे वचन देत माझ्यावर मुंबईच्या डॉक्टरने जुलै 2018 आणि सप्टेंबर 2020दरम्यान वारंवार बलात्कार केला असल्याचे नमूद केले आहे तसेच मला गर्भपात करण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे मी गर्भपात न केल्यास माझे आपत्तीजनक व्हिडीओ सार्वजनिक करेन अशी धमकीही मला देत असल्याचे पीडितेने सांगितले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply