Breaking News

आरसीएफच्या आदिवासी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स  (आरसीएफ), थळ युनिट यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कामगार स्मृतिचषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला बुधवारी (दि. 1) प्रारंभ झाला.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 मे रोजी ‘कामगार स्मृती चषक’ जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील 1 मे रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. आरसीएफ क्रीडा संकुल, आरसीएफ कुरूळ वसाहत, सरखेल कान्होजी आंग्रे नगर, कुरूळ-अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आरसीएफ थळचे कार्यकारी संचालक

आर. पी. जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 पुरुष आदिवासी संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघास रोख रुपये 10,000 व चषक, उपविजेत्या संघास रोख रुपये 7500 व चषक, तृतीय क्रमांकास रोख रुपये 5000 व चषक, चतुर्थ क्रमांकास रोख रुपये 5000 व चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस रोख रुपये 2000 व चषक, उत्कृष्ट पकडीस रोख रुपये 1000 व चषक, उत्कृष्ट चढाई रोख रुपये 1000 व चषक अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply