Breaking News

भाजप निरीक्षक नीता केळकर उद्या रायगडात

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य व रायगड जिल्हा निरीक्षक नीता केळकर बुधवारी (दि. 28) जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवार आणि तालुका मंडल अध्यक्षांची भेट घेणार आहेत.

नीताताई बुधवारी सकाळी 10 वाजता पेण येथे पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड, तर सायंकाळी 4 वाजता पनवेल येथे पनवेल, उरण व कर्जत विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि तालुका मंडल अध्यक्षांची भेट घेणार आहेत. या वेळी त्या तालुका अध्यक्षांकडून त्यांच्या क्षेत्राचा राजकीय व संघटनात्मक आढावा घेणार आहेत, असे पक्षामार्फत कळविण्यात आले आहे.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply