Breaking News

हळदी-कुंकू कार्यक्रमांतून संस्कृतीचे जनत; महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून प्रभागातील सेक्टर 5 मधील अधिराज गार्डन येथे हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी, हळदी-कुंकू कार्यक्रमातून हिंदू संस्कृतीचे जतन केले जात असल्याचे प्रतिपादन केले. पारंपरिक सणाला वाण देण्यासोबत आधुनिकतेची जोड देण्यात आली. या वेळी मेहंदी, टॅटू, हेअर मेकअप, पेस्ट्रिज मेकिंग,  क्राफ्ट मेकिंग, वारली पेंटिंग बॅग्ज, ज्वेलरी अ‍ॅण्ड सिल्वर थ्रेड, हॅण्डलूम्स साडी, हॅण्डमेड ज्वेलरी याचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दीपप्रज्वलन करून केली. पाहुण्यांचे स्वागत समारंभाला अधिराज गार्डन सोसायटीतील मुलींनी नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या कार्याचे कौतुक केले. याशिवाय पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने स्त्री सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची माहिती त्यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा मिश्रा, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम व संजना काकडे यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, अ- प्रभाग समिती सभापती संजना कदम, मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजिका मोना अडवाणी, समीर कदम, मंडळ उपाध्यक्षा बीना गोगरी, सोशल मिडिया संयोजक अजय माळी, उद्योग आघाडी उपाध्यक्ष प्रशांत दुडम, सुशीला शर्मा, निर्मला राव, वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे विजय उजलंबे उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply