Breaking News

रक्तदान हेच श्रेष्ठदान!; रामशेठ ठाकूर महाविद्यालयाने जपली सामाजिक बांधिलकी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि सार्वजनिक रूग्णालय वाशी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार ( दि. 2 मार्च) रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय मराठे यांच्या हस्ते झाले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन या शिबिरात त्यांनी केले. विज्ञानाच्या धावत्या युगामध्ये तंत्रज्ञानाची जितकी गरज आहे तितकीच सुदृढ आरोग्याचीही गरज आहे. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी रक्तदान अत्यावश्यक आहे. म्हणून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोरोना काळात रक्ताची कमतरता भासल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातात जखमी झालेल्यांना, गभ्रवती महिलांनाही रक्ताची आवश्यकता भासत असते. त्यामुळे या शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करित असल्याचे आयोजकांनी सांगितले. या वेळी राष्ट्रीय सेवासंघाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण सावे, प्रा. रोहित पाटील, प्रा. मानसी शहा आणि प्रा. भरत सोनांकी आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी रक्तदान केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply