पनवेल ः वार्ताहर
कामोठेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये छोट्या वैज्ञानिकांसाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी नियोजन, वीज निर्मिती यांसह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प सादर केले होते. सेवा सहयोग यांच्या माध्यातून आयोजन करण्यात आले होते. सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेद्वारे फिरती विज्ञान प्रयोगशाळा चालवण्यात येत आहे. या नॅनो रॉकेट गाड्या विविध भागांत फिरतात. ही फिरती प्रयोगशाळा शिक्षकांसह अशा सर्व शाळांत आणि वस्तीमध्ये जाते जिथे सुसज्ज प्रयोगशाळा नाहीत. अशा शाळांमध्ये जाऊ न अभ्यासक्रमातील विविध प्रयोग मुलांना करून दाखवतात. या वर्षीही सेवा सहयोग फाऊंडेशनने विज्ञान दिनाचे औचित्य साधून छोटे शास्त्रज्ञ ही नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन हा दिवस साजरा केला. विद्यार्थ्यांना रॉकेट मेकिंग, आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा व खेळ आयोजित केले होते. त्या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देण्यात आली. या प्रदर्शनात पनवेल, नवी मुंबई, घाटकोपर, विरार, भाईंदरमधील 94 शाळाच्या अभ्यासिकेचे 239 शिक्षक व एक हजार 134 विद्यार्थी सहभागी झाले होते.