पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 17 येथे हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.2) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दीड लाख रुपयांची देणगी दिली. या वेळी त्यांनी मंदिरासाठी आणखीनही आर्थिक मदत ते करणार असल्याचे सांगितले. उलवे नोड सेक्टर 17 येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्पेक्स समोर झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजप उत्तर भारतीय संघ उलवेचे अध्यक्ष अवधेश कुमार महतो, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष उलवे नोड अध्यक्ष योगिता भगत, अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, वसंतशेठ पाटील, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, भाऊ भोईर, सुजाता पाटील, कामिनी कोळी, किशोर पाटील, कमलाकर देशमुख, आशिष घरत, सुहास भगत, मनोज कुमार मौर्य, अॅड. सूनील मौर्य, आशिष मिश्रा, संदीप कुमार, डेविस सर, सुभाष पांडे, अभिषेक भट्टाचार्य, प्रशांत शिवलकर, जवाहरलाल चव्हाण, सागरकुमार रंधवे, अविनाश कजबजे, आदर्श तिवारी आदी उपस्थित होते.
यासोबतच ग्रीन व्ह्यूव, मोहन रेसिडेन्सी, ड्रीम हेरिटेज, नीलकंठ प्राईड, तेजस हाइट्स, साई सागर गॅलक्सी, गुरू आत्मन, आदिनाथ हेरिटेज, साई ऑर्चिड, सिग्नेचर इलाईट, टुडे इम्पेरिया, आर.एस.एम.डायमंड या सोसायट्यांचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …