Breaking News

बारावीची बोर्ड परीक्षा सुरू

 कर्जत तालुक्यातील 14 केंद्रांवर 2460 विद्यार्थी

कर्जत : बातमीदार

शुक्रवारपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास जास्त मिळणार आहे. कर्जत तालुक्यात 2460 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून तीन मुख्य आणि 11 उपकेंद्रांवर परीक्षा सुरु झाली असल्याची माहिती कर्जत शिक्षण विभागाने दिली. आज पहिल्या पेपरसाठी आपल्या पाल्यांना घेऊन पालक मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रांवर पोहचले होते.

कर्जत तालुक्यातील 14 कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षा शिक्षण दिले जात असून कोरोनाच्या कालावधीनंतर यावर्षी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी तीन प्रमुख केंद्रे देण्यात आली आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी तालुक्यात अभिनव प्रशाला – कर्जत, नेरळ विद्या मंदिर – नेरळ आणि भाऊसाहेब राऊत विद्यालय – कशेळे ही तीन मुख्य केंद्रे आहेत. शिवाय ज्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालये आहेत, त्या 11 ठिकाणी बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. तालुक्यातील तीन मुख्य आणि 11 उपकेंद्रे मिळून 14 ठिकाणी 2460 विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देत आहेत.

कर्जतच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा हिरवे या बारावीच्या परीक्षेच्या परिरक्षक असून त्यांना इ. ग. म्हात्रे हे उपपरिरक्षक म्हणून सहकार्य करीत आहेत. शिवाय परीक्षा मंडळाने तालुक्यातील 14 केंद्रावर रनरदेखील नेमले आहेत.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply