Breaking News

निर्बंध शिथिलतेनंतर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित

ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद; खरेदीसाठी वर्दळ वाढली

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेलसह नवी मुंबईतील निर्बंध शिथिल झाल्यामुळे व्यापारी व दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निर्बंध पूर्णपणे शिथिल केल्यामुळे ग्राहकही आता कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. पनवेल परिसरात महानगरपोलिकेतर्फे लसीकरणावर भर दिल्याने बाधितांची संख्या घटली आहे. त्यामुळे येथील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षांत झालेले आर्थिक नुकसान भरून निघेल, अशी आशा दुकानदार व्यक्त करीत आहेत.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे व्यापारी वर्ग, दुकानदार, मॉल तसेच हॉलधार या सर्वांनाच मोठ्य आर्थिक नुकसाीला सामोरे जावे लागले आहे. मात्र आता राज्य शासनाने दिलेल्या निकषांमध्ये पनवेल व नवी मुंबई महापालिका बसत असल्याने येथील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहेत. आता लग्सराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकही मनसोक्त खरेदी करीत आहेत. कपडे, दागिने यांसह लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत. शहरात असणार्‍या विविध मॉलसह मोठ्या व्यापारी संकुलांमध्ये होणारी उलाढाल वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 लग्नसराईमुळे खरेदीला उधाण

एकीकडे शासनाच्या सातत्याने बदलणार्‍या नियमावली तर दुसरीकडे कोरोना नियमावली भंग केल्यामुळे वारंवार पालिकेकडून होणारी दंडात्मक कारवाई यामुळे व्यापार्‍यांमध्येही नाराजीचे वातावरण होते. परंतु, आता पूर्णपणे निर्बंध शिथिल केल्याने पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व लग्नसराई असल्याने या आठवडयातील शनिवारी व रविवारी मॉल व इतर ठिकाणीही खरेदीला उधाण आले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply