Breaking News

उरण येथे स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांच्या सौजन्याने उरण शहरातील शासकीय कार्यालय येथे उरण शहरात मंगळवारी (दि. 1) सकाळी 7.30 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छता केलेल्या सरकारी कार्यालयाचे आवाराचे क्षेत्रफळ 9838 चौ.मी. होते. या स्वच्छता अभियाना अंतर्गत 31.4 टन कचरा काढण्यात आला.

उरण शहरातील तहसिलदार व पोलीस ठाणे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी नगरपालिका शाळा उरण, न्यायालय, ग्रामीण रुग्णालय उरण, पंचायत समिती उरण, नगरपालिका कार्यालय, आय. टी. आय आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. एकूण 1296 श्रीसदस्य यांनी सहभाग घेतला होता. सदस्या व्यतरिक्त सरकारी कार्यालयाचे 10 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply