जालना : ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी (दि. 24) जालन्यात ओबीसी प्रवर्गातील सर्व घटक एकवटले होते. या मोर्चात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार भागवत कराड, विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, राजेश राठोड आदी सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला. मोर्चात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक समाजबांधव सहभागी झाले होते. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. या वेळी अनेक वक्त्यांनी ओबीसींप्रति दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, तसेच जनगणनेसह विविध मागण्या केल्या.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा ‘रयत’कडून गौरव
विद्यमान शैक्षणिक वर्षात सात कोटी 11 लाख रुपयांची देणगी सातारा ः रामप्रहर वृत्त समाजकारणाला महत्त्व …