Breaking News

पनवेलमध्ये गटारे, रस्त्यांची सुरू असलेल्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहरातील गटारे आणि रस्त्याच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी (दि. 5) अधिकार्‍यांसह पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच गटारे सफाईची सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला.
पनवेल शहरातील साईनगर, कापड बाझार, पंचरत्न सर्कल, मार्केट यार्ड, डंम्पींग ग्राऊंड या परिसरामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून रस्ते आणि गटारांनी कामे सुरू आहे. या कामांची पनवेल महापालिकेेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्‍यांसोबत पाहणी करून या कामांचा आढावा घेतला. तसेच याबाबत अनेक सूचना अधिकार्‍यांना दिल्या.
या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोर्ईर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, शहर अभियंता संजय कटेकर, शैलेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply