Breaking News

नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान

कर्जत : प्रतिनिधी

निहारिका फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेत तांत्रिक प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सोबत घेऊन हे अभियान राबविले. नेरळ स्थानक प्रबंधक गगन मीना व शिरीष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या वेळी नेरळ स्टेशनमधील सर्व फलाटांवरील कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आले.

या अभियानात फाऊंडेशनचे प्रमुख गणेश भोपी तसेच अविनाश डायरे, पोलीस उपनिरीक्षक प्रणिता ढोरे, पोलीस नाईक अंगद फड यांच्यासह विद्यार्थी व रेल्वे कर्मचारी  सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply