Breaking News

स्वर्गीय संजय भोपी पुण्यस्मरणदिनी धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल परिसरातील स्वर्गीय संजय दिनकर भोपी यांच्या प्रथम स्मृतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्यानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय संजय भोपी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी (दि. 6) प्रथम प्रतिमा पूजन, त्यानंतर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, आदई यांचे भजन होणार आहे. यामध्ये पखवाजसाथ चेतन पाटील यांच्यासह विश्वास पाटील व बाबुराव शेळके यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम निळकंठ पार्क सोसायटी, सेक्टर 06, खांदेश्वर मंदिराजवळ होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वामन भोपी, स्वर्गीय संजय भोपी यांच्या पत्नी प्रेमा भोपी, यशवंत भोपी, स्वर्गीय संजय भोपी यांचे पुत्र अभिषेक भोपी व आनंद भोपी यांनी केले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply