Breaking News

पाली खोपोली मार्गावर सांडले ऑईल

कार अपघातासह मोटारसायकलस्वार कोसळून जखमी

पाली : प्रतिनिधी : पाली-खोपोली मार्गावर सांडलेल्या ऑईलवरून शुक्रवारी (दि. 22) अनेक वाहने घसरल्याची घटना घडली. त्यात काही मोटारसायकलस्वार कोसळून जखमी झाले, तर एका कारचा अपघात झाला. पाली-खोपोली मार्गावर वजरोली गावानजीक एका वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. रस्त्यावरून येणार्‍या मोटारसायकलस्वारांना ऑईल साडल्याचे लक्षात येण्याआधीच ते घसरून पडत होते. मोटारसायकलस्वार जखमी होण्याच्या घटना सुरू असताना पालीकडून चिपळूणकडे चाललेल्या मारुती सुझुकी कार (एमएच-03, एएम-6750)चे चालक संजय भोसले यांना रस्त्यावर पडलेल्या ऑईलचा अंदाज आला नाही. त्यामुळे ऑईलवरून घसरलेल्या कारने दिशा बदलली. सुदैवाने त्या वेळी समोरून कोणतेही वाहन न आल्याने विरुद्ध दिशेला गेलेल्या कारचा अपघात थोडक्यावर निभावला, मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. ऑईलवरून वाहने घसरत असल्याची बाब लक्षात घेऊन प्रवाशांनी जवळपासची माती ऑईलवर टाकली. काही तरुणांनी अपघातस्थळी थांबून येणार्‍या-जाणार्‍यांना ऑईल सांडल्याची माहिती देऊन सावकाश जाण्याबाबत सुचविले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply