Breaking News

“पेण खारेपाटात अशुद्ध, गढूळ पाणीपुरवठा”

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त
पेण तालुक्यातील खारेपाट भागात शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर राज्य शासनाचे लक्ष वेधले.
खारेपाट भागात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे जानेवारी 2022मध्ये निदर्शनास आले आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे या धरणावर बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण संयंत्र कित्येक वर्ष बंद असल्यामुळे लाखो रुपये खर्च करूनसुद्धा विभागातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत नाही. या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीत काय आढळून आले व त्या अनुषंगाने शहापाडा धरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करून येथील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात दाखल केला होता.
या प्रश्नावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, खारेपाट भागात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही शहापाडा धरणातून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याची बाब अंशतः खरी आहे. धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे अशुद्ध व गढूळ पाणीपुरवठा झाला होता. त्यामुळे हा पाणीपुरवठा त्वरित बंद करण्यात आला, मात्र सद्यस्थितीत सिडकोकडून पाणी उपलब्ध करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply