खालापूर ः प्रतिनिधी
क्रिकेट प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि अशा सामन्यांचे थेट प्रेक्षपण होत असल्याने जगात कुठेही हे सामने बघणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते खोपोलीत बोलत होते. खोपोली मोगलवाडी, भानवज, काटरंग, मॉर्निंग 11 यांच्या वतीने एकविरा मैत्री ग्रुप प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. खालापूर तालुक्यातील वारीला मावळमध्ये अपघात झाला होता. त्या वेळी शासकीय मदतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार झालेल्या मदतीबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने या वेळी सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर वारीसाठी वारी मार्गाचे काम चालू केले आहे असे सांगून हा कार्यक्रम तरुणांचा असला तरी या तरुणांना निश्चितपणाने सामाजिक जबाबदारीचे भान आहे आणि म्हणूनच खोपोली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते फक्त क्रिकेट सामान्यांसाठीच नाही, तर खोपोलीकरांच्या सर्व सुखदुःखात पाठीशी ठामपणे उभे असतात. खोपोली हे एक अर्थाने सर्व पद्धतीच्या कलावंतांचे, गुणवंतांचे आश्रयस्थान आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व खोपोली मंडल निरीक्षक सुनील घरत, मंडल अध्यक्ष इंदर खंडेलवाल, उपाध्यक्ष दिलीप पवार, चिटणीस सुमिता महर्षी, युवा नेते राहुल जाधव, सूर्यकांत देशमुख, वैद्यकीय सेलचे विकास खुरपुढे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, महिला मोर्चा जिल्हा खजिनदार रसिका शेट्टे, सदस्य अनिता शाह, मंडल सरचिटणीस अश्विनी अत्रे, चिटणीस सीमा मोगरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.