पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता पाटील यांनी झोपडपट्टीवासीयांना मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
नगरसेविका सीता पाटील यांनी खांदा वसाहतीतील झोपडपट्टीत जाऊन त्या ठिकाणच्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत केक कापून वाढदिवसाला खर्या अर्थाने सामाजिक स्वरूप दिले. तसेच येथील रहिवाशांना आणि लहान मुलांना मास्कचे वाटप करण्यात आले. याशिवाय जीवनावश्यक वस्तू सुद्धा देऊन वाढदिवसानिमित्त दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.