Breaking News

शासकीय अध्यापक महाविद्यालयात वारली चित्रकला कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त इतिहास मंडळाने रविवारी (दि. 8) वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दोन सत्रात झाली.

प्रथम सत्रातील उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, इतिहास मंडळ प्रमुख डॉ. सुनिता लोंढे, डॉ. सुविद्या सरवणकर, डॉ. नीलिमा मोरे, डॉ. रमेश भोसले, नितीन गुरव, विद्या पाटील, मुकेश पांडे व नियमित बी.एड च्या विद्यार्थ्यांसह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.एड् विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

वारली चित्रकला ही महाराष्ट्राला मिळालेली एक देणगी आहे. आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील निसर्ग, प्राणी, पक्षी, शेती, झोपड्या, झाडे, नदी, पाडा (गाव) याचे प्रतिबिंब वारली कलेत उमटते. त्रिकोण आणि सरळ रेषा या माध्यमातून सारवलेल्या भिंतींवर तांदळाच्या भिजवलेल्या पिठीतून बांबूच्या काड्यांनी निर्माण होणारी वारली चित्रकला हे महाराष्ट्राचे वैभव आहे आणि ते जतन केले पाहिजे. हीच कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी

नितीन गुरव, विद्या पाटील, मुकेश पांडे यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी देखील कोलाज, वारली चित्रकला, मातीच्या वस्तू असे बरेच काही शिकण्यात रमले. दुसर्‍या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे अभिनेते प्रसाद पंडित यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षक यांचे जीवनातील खरा अर्थ आणि महत्त्व मनोगतातून पटवून दिले. तसेच त्यास समवेत प्रमुख पाहुणे म्हणून पंडित कुलकर्णी, पंडित नाईक, राघवेंद्र कटोटी, राजेंद्र पोतदार, अजय दवे, विजय भावसार, अजय अग्रवाल, विठ्ठल वाघमारे, मीस्टर बेहरा उपस्थित होते. या दोन्ही सत्राचे निवेदन व्दितीय वर्ष बी.एड विद्यार्थ्यींनी इतिहास मंडळ विद्यार्थी प्रतिनिधी तेजस्विनी शिळीमकर हिने केले. तर कार्यशाळेस इतिहास विषयाची विद्यार्थिनी कविता गुंजवटे हिचे सहकार्य लाभले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply