Breaking News

महाडमध्ये आढळल्या एकच नंबरच्या 500 रुपयांच्या दोन नोटा

महाड : प्रतिनिधी

शहरामधील दोन दुकानांमधून एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा वापर झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

महाडमधील एका हॉटेल व्यावसायिकाकडे आलेली पाचशे रुपयाची नोट बनावट असल्याचा संशय आल्याने तो समोरच असलेल्या एका पानटपरीवर नोट दाखवण्यास गेला. त्यावेळी आपल्याकडेही अशाच प्रकारची नोट असल्याचे पानटपरीवाल्याने सांगितले. या दोघांनी  नोटेवरील नंबर एकच असल्याचे दिसून आले. यामुळे या दोघा व्यवसायिकांना पाचशे रुपयाचा तोटा सहन करावा लागला आहे.

या दोन्ही नोटांवरील क्रमांक 4 डीआर 080709 असा असून सदर नोटा मोजणी यंत्रामध्ये टाकल्या असता यंत्रानेदेखील त्या बनावट असल्याचा मेसेज दिला. नुकताच झालेल्या छबिना उत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने बनावट नोटांचा वापर केल्याचा संशय व्यक्त होत आहे. महाड बाजारपेठेत अशाप्रकारच्या आणखी नोटा वितरित झाल्या असण्याचा संशय व्यक्त होत आहे. वरील नंबरची नोट आढळून आल्यास तिची खात्री करावी असे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे.

ग्राहकांनी किंवा नागरिकांनी आपल्याकडील नोट तपासून घ्यावी. डिजिटल देवाण-घेवाणीचा अधिकाधिक उपयोग करून अशा प्रकारच्या नकली नोटांपासून मुक्ती मिळवता येईल. -किसलय कुमार, शाखा अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply