पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या क्रीडा भवनात महाक्रीडा प्रबोधिनीच्या सहकार्याने राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुष व महिला गटात आणि सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर, मास्टर अशा प्रकारात अनेक जिल्ह्यांतून नामवंत पुरुष आणि महिला खेळाडूंनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशा एकूण 15 पदकांची कमाई केली. रायगडातील पदकविजेत्या खेळाडूंचे रायगड जिल्हा पॉवरलिफ्टिंग संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गिरीश शरद वेदक, प्रभारी सेक्रेटरी अरुण पाटकर, सहसेक्रेटरी सचिन भालेराव तसेच संदीप पाटकर, राहुल गजरमल आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर यांनी अभिनंदन केले.
पदकविजेते खेळाडू : सुवर्ण-अमृता भगत, कुणाल पिंगळे, महेश कृष्णा पाटील, विनायक पाटील, सर्वर पाटील, रौप्य-मुक्ताई गायकवाड, मृणाल पाटील, अक्षय शनमुगम, राजेश अंगद, कांस्य-श्रुती मोरे, वैष्णवी चव्हाण, प्रथमेश भालेकर.