Breaking News

पालीदेवद ग्रामपंचायतीतर्फे लस घेण्याचे आवाहन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीतील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यांच्यामार्फत मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे, त्यांनी सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलमध्ये लसीकरण केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस आणि पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरा डोस सुकापूरच्या या केंद्रावर उपलब्ध होईल. लसीकरणाची वेळ सकाळी 10 वाजलेपासून सुरू होत आहे. नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच योगिता राजेश पाटील, उपसरपंच अशोक पाटील, ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत यांनी केले आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply