पनवेल ः रामप्रहर वृत्त
मिस्तु केम प्लास्ट लि. कंपनी खोपोली आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 26 व 27 मार्च रोजी नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या स्पर्धेचे उद्घाटन मिस्तु केम प्लास्ट लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर संजय डेढीया यांच्या हस्ते 26 मार्च रोजी सकाळी 9 वाजता होईल. स्पर्धा नवोदित (बिगिनर्स) मुली व मुले, 11 वर्षाखालील मुली व मुले आणि 13 वर्षाखालील मुली व मुले अशा तीन गटांत घेण्यात येणार आहे.