कर्जत ः बातमीदार
आठव्या रेन्बो कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कर्जतच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत राज्याच्या वेगवेगळ्या भागातून एकूण 530 स्पर्धक काता, कुमिते (फाईट) आणि वेपन्स प्रकारात सहभागी झाले होते. स्पर्धेतील काता प्रकारामध्ये कर्जतमधील भूषण बडेकर, आशुतोष ताम्हाणे, ध्रुव परदेसी, ऋतुजा मरले, आयुश देशमुख, तन्वी बडेकर, कबीर वारंगे या खेळाडूंनी यांनी सुवर्ण, धीरज कांबळे, सुरज दातिर, आरोही देशमुख यांनी रौप्य, आणि पायल भोसले या खेळाडूने कांस्यपदक पटकाविले. कुमिते (फाईट) या प्रकारात कबीर वारंगेने सुवर्णपदकाची कमाई केली. या राज्यस्तरीय स्पर्धेत कर्जत तालुक्यातील खेळाडूंनी एकूण 12 पदकांची कमाई केली. यामध्ये आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्यपदकाचा समावेश आहे. पदक विजेते खेळाडू हे रेन्बो बुडोकॉन कराटे अकॅडमीमध्ये वसंत शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक नरेश बडेकर, विशाल गायकवाड यांच्याकडून कराटेमधील डावपेच शिकत आहेत.