Breaking News

आरोग्य महाशिबिर यशस्वी करा ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन

पनवेल : सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर यंदा 4 ऑगस्टला होणार असून, दरवर्षीप्रमाणे हे महाशिबिर यशस्वी करावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नियोजन बैठकीत केले. सिडको अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष व रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या नियोजनासंदर्भातील पहिली बैठक सुकाणू समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 15) झाली. त्या वेळी ते बोलत होते.

कार्यकर्ते, डॉक्टर व त्यांचे सहकारी आणि स्वयंसेवकांच्या मेहनतीतून आरोग्य महाशिबिर दरवर्षी यशस्वी होत आले आहे. मनापासून केलेले काम नेहमी यशस्वी होत असते. म्हणूनच यंदाही या महाशिबिराचा रुग्णांना चांगल्या प्रकारे लाभ झाला पाहिजे व त्यांना योग्य सेवा मिळाली पाहिजे, यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सूचित केले.  

भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी उपस्थितांना शिबिरासंदर्भातील नियोजनाची व समित्यांच्या जबाबदार्‍यांची माहिती दिली. या शिबिराच्या नियोजनासाठी 24 समित्यांचे गठन करण्यात आले असून, त्यांची आढावा बैठक येत्या शनिवारी (दि. 20) होणार आहे. या वेळी व्यासपीठावर महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, राज्य परिषद सदस्य सी. सी. भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, समित्यांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply